आता जिल्ह्याच्या पोस्ट कार्यालयात मिळणार पासपोर्ट

0

नवी दिल्ली, ता. १४ : पासपोर्ट साठी नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून येत्या दोन वर्षात देशात ८०० जिल्ह्यातील मुख्य पोस्ट कार्यालयांमध्ये पासपोर्ट केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी ही माहिती दिली. यंदा देशात १५० पासपोर्ट केंद्र सुरू करण्यात आली असून येत्या २ वर्षात ८०० केंद्र सुरू होतील असेही ते म्हणाले.

यासंदर्भात या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आली होती. या केंद्रांमुळे नागरिकांना पासपोर्टसाठी आता दूरवर जावे लागणार नाही.

LEAVE A REPLY

*