ऑनलाईन सातबारासाठी 15 ऑगस्टचा मुहूर्त

0

नाशिक । दि. 27 प्रतिनिधी
ऑनलाईन सातबारा वाटपासाठी जिल्हा प्रशासनाने स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्टचा मुहूर्त शोधला आहे. जिल्ह्यात आजमितीस 96.63 टक्के सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

राज्य सरकारने 1 जुलैपासून ऑनलाईन सातबारा वाटप करण्याची तारीख निश्चित केली होती. मात्र नाशिकसह राज्यभरातील सतर जिल्ह्यांमधील संगणकीकरणाचे काम कासवगतीने सुरू असल्याने हा मुहूर्त टळला. त्यानंतर 1 ऑगस्टपासून ऑनलाईन सातबारा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.

परंतु कामाचा वेग बघता शासनाने आता ऑनलाईन सातबारा वाटपासाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त काढला आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने वेळेत कामकाज पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात एकूण 12 लाख 18 हजार 331 खातेदार आहेत. त्यापैकी 11 लाख 80 हजार 910 सर्व्हे क्रमांकाचे संगणकीकरणाचे कामकाज पूर्ण झाले आहे. आदिवासी तालुका असलेल्या पेठचे संगणकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. तालुक्यातील 99.99 टक्के सातबारा संगणकीकरण पूर्ण झाले आहे.

नाशिक तालुका मात्र पिछाडीवर असून तालुक्यातील 88.93 टक्के सातबारा संगणकीकृत करण्यात आले आहेत. दरम्यान, 15 ऑगस्टपासून कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन सातबारा देणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील 99.87 टक्के सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या कामात नाशिक राज्यात 25 व्या स्थानी आहे.

LEAVE A REPLY

*