Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रआता वाजवा फटाके : उत्तर महाराष्ट्रातील बंदीचा निर्णय मागे

आता वाजवा फटाके : उत्तर महाराष्ट्रातील बंदीचा निर्णय मागे

ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिकसह (nashik)उत्तर महाराष्ट्रात फटाके (firecrackers) विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal)यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात फटाकेबंदी लागू करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (radhakrishna game)यांनी काल निर्देश दिले होते. मात्र हे निर्णय मागे घेण्यात यावेत म्हणून भुजबळांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंशी संवाद साधला.

दीड वर्षानंतर कॉलेज गजबजले, कॅन्टीनमध्ये गर्दी

- Advertisement -

नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार व नगरमधील महापालिका, नगरपालिकांसाठीदेखील ठराव मंजुरीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

विभागीय पातळीवर पहिल्यांदाच फटाक्यांवर बंदी घालण्यात आल्याने स्थानिकांसह फटाके विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. विभागीय आयुक्तांच्या या निर्णयावर हिंदुत्ववादी संघटनांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मध्यस्थी करत हा तिढा सोडवला. भुजबळ यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी थेट संवाद साधून फटाके बंदीचा निर्णय मागे घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार कुंटे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

फेसबुक आपले नाव बदलणार

काय होते आयुक्तांचे पत्र

उत्तर महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका, महानगरपालिकांनी 15ऑक्टोबरच्या आधी फटके बंदीचा ठराव मंजूर करावा. २२ ऑक्टोबर पर्यंत त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध होणे आवश्यक असल्याचं आयुक्तांनी आपल्या पत्रात दिल्या आहेत.

का केली होती फटाक्यांना बंदी

विभागीय आयुक्तांनी शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाचा संदर्भ देत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी फटाके बंदीचा ठराव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माझी वसुंधरा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रारूप टूलकीटनुसार फटाके बंदीसाठी पुढाकार घेण्यात आला असून, पर्यावरण संवर्धन व हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शंभर गुण देण्यात आले आहेत. दिवाळीत फटाक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यात शहरी भागात अधिक प्रमाण असल्याने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात फटाक्यांच्या विक्री व वापरावर बंदी घालण्याच्या दृष्टीने ठराव करणे आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या