संपात सहभागी प्रकरणी चौदाशे रेशन दुकानदारांना नोटिसा

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- संप पुकारल्याने लाभार्थी रेशन धान्यापासून वंचित राहिल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील 1 हजार 420 रेशन दुकानदारांना नोटिसा बजाविण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली आहे.
अगोदरच तालुकास्तरावरुन दुकानापर्यंत रेशनचा माल पोहचविण्यात उशिर झाला.त्यात मशिनव्दारे धान्य वाटप करताना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
त्यामूळे थेट लाभार्थीयांच्या हाती धान्य वाटप करतांना नियोजनाअभावी आता अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामूळे ऑगस्ट महिन्यातील वितरण दूरच पंरतू अद्याप जुलै महिन्यांतील राशन सर्वसामान्य जनतेला मिळाले नसल्याचे दिसून येत आहे.
बायोमॅट्रिक पध्दतीने धान्य वाटप करण्यासाठी कंबर कसणार्‍या जिल्हा पुरवठा विभागाने हमालांच्या वाराई प्रश्‍नी व रेशन दुकान दारांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केल्याने आता त्रास सर्वसामान्य लाभार्थीयांना सोसावा लागत आहे. पुरवठा विभागाला शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात अद्याप यश आले नाही. त्यामूळे धान्य वितरण करणारा ठेकेदार व दुकानदार यांच्यानावे बोटे मोडण्याचा कार्यक्रम पुरवठा विभागाने सुरु केल्याच्या भावना दुकानदारांमधून व्यक्त केल्या जात आहेत.

तर, दुकानदारांवर कारवाई –
जिल्ह्यातील शंभर टक्के लाभार्थीयांना धान्य वाटप होणे अपेक्षित आहे.मात्र, अद्याप बहुतांश ठिकाणी दुकानदारांच्या संपामुळे धान्य वितरण बंद आहे.त्यांच्या प्रश्‍नांचा विषय हा राज्याचा आहे.त्यामूळे संबधिताना नोटिसा बजात्तिण्यात आल्या असून सरकारच्या पुढील निर्देशानूसार वस्तु सेवा कायदा व अन्न सुरक्षा कायद्यातर्ंगत कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगितले.

संपाला संमिश्र प्रतिसाद – 
1 ऑगस्टपासून संप पुकारला.मात्र, बहूतेक ठिकाणी जुलैचा माल येण्यास 31 जुलैची तारिख उजाडली.संपाची हाक तर, 1 ऑगस्टपासून आहे.त्यामूळे जुलैचा माल लाभार्थीयांना वाटावच लागणार.काहींचा जुलैचा माल संपला.त्यामूळे ते आता ऑगस्टचा माल घेण्यासाठी चलन पास करणार नसल्याचे समजते.श्रीगोंदा तालुक्यातील शंभर टक्के दुकाने सुरु असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*