Type to search

Featured सार्वमत

सीना पुलाच्या कामासंदर्भात पीएमसीला नोटीस

Share

मे. ए. सी. कोठारी फर्म आणखी अडचणीत : अहवाल सादर करण्याच्या सूचना

अहमदनगर (प्रतिनिधी) – रेल्वेस्टेशनजवळ सीना नदीवरील पुलाच्या कामासंदर्भात या कामावर नियंत्रण असलेल्या प्रकल्प व्यवस्थापन संस्थेला (पीएमसी) महापालिकेने नोटीस दिली असून, कामातील त्रुटींसंदर्भात सात दिवसांत अहवाल देण्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे काम देखील मे. ए. सी. कोठारी संस्थेकडेच आहे.

रेल्वेस्टेशनजवळील लोखंडी पुलाजवळ रहदारीसाठी पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. तसेच कामासंदर्भातही अनेकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेने या कामावर नियंत्रण ठेवणार्‍या इन्फिनिटी कन्सल्टिंग इंजिनिअर्स या पीएमसीला नोटीस दिली आहे. या नोटीसमध्ये कामांबाबतच्या त्रुटींचा अहवाल देण्याचे सांगितले आहे. तसेच यावर निर्णय होईपर्यंत संबंधित ठेकेदार कंपनीचे कोणतेही देयक सादर न करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

नोटीसमध्ये निविदा विषयक तसेच कामाशी निगडित सर्व तांत्रिक कामगपत्रांचे मूळ संच सादर करून त्याच्या योग्यतेबाबत अभिप्राय देणे, झालेल्या कामाचे त्रयस्थ परीक्षण अहवाल सादर करणे, झालेल्या कामाचे काही भागात खालीवर किंवा चढ उतार झाला असून, याबाबतचा खुलासा व त्याबाबत काय कारवाई केली, त्याबाबत अहवाल सादर करणे, पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व मोर्‍या खुल्या करून प्रवाहातील अडथळे दूर करणेबाबत अहवाल सादर करणे, काही ठिकाणी केलेला भराव योग्य नसल्याने त्याबाबत कार्यवाही करून अहवाल देणे, काम संथ गतीने सुरू असून, याबाबत ठेकेदार संस्थेकडून खुलासा मागवावा.

तसेच खुलासा योग्य न वाटल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्याबाबतचा अभिप्राय असलेला अहवाल देणे, कामामध्ये झालेले बदल, जादा कामांच्या बाबी आदीबाबतचे सुधारित अंदाजपत्रक सादर करावे, कामाचे नियोजन करून कामाची मुदत किंवा मुदतवाढ याबाबत कारणे मिमांसासह सात दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना या नोटीसमध्ये देण्यात आल्या आहेत.

बोल्हेगाव रस्त्याचे प्रकरण घडल्यापासून मे. ए. सी. कोठारी फर्म वादग्रस्त ठरली आहे. या संस्थेकडील 19 कामे रद्द करून त्यासाठी जमा करण्यात आलेली अनामत रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. त्यांच्या इतर कामांबाबतही महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. त्यातच आता या पुलाच्या कामाबाबत थेट पीएमसीला नोटीस दिल्याने ठेकेदार संस्था आणखी अडचणीत आली आहे.

विळद पंपिंग केंद्रातील वीजदाब वाढणार – 
पाणी उपसा व इतर कामासाठी आवश्यक असलेला वीज दाब विळद घाट येथील पंपिंग स्टेशनला मिळावा यासाठी महापालिकेचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न होते. महावितरणने यासाठी तीन कोटीं खर्चाचे अंदाजपत्रक दिले होते. मात्र त्यात आता थोडा बदल झाला असून, हे अंदाजपत्रक त्यामुळे दोन कोटी 39 लाखांवर आले आहे. हे पैसे महापालिकेने जमा केल्याने वीजदाब वाढण्याचा मार्ग रिकामा झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!