Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकातील मनसेना पदाधिकार्‍यांना नोटीसा

नाशकातील मनसेना पदाधिकार्‍यांना नोटीसा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मशिदींवरील भोंगे ( Loudspeakrs on Masjids ) न उतरवल्यास हनुमान चालिसा ( Hanuman Chalisa ) वाजवण्याचे आवाहन मनसेना अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray )यांनी केल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेस बाधा येण्याची शक्यता शहर पोलिसांनी वर्तवली आहे.

- Advertisement -

त्यामुळे शहर पोलिसांनी मंगळवारी (दि.3) मनसेनेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना 4 ते 8 मे पर्यंत शहरात वास्तव्य न करण्यास सांगितले आहे. तर इतरांना सीआरपीसी 149 नुसार नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शहरात शांतता राहावी यासाठी पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. रमजान ईदनिमित्त जो बंदोबस्त तैनात होता तोच बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. पोलिस ठाणेनिहाय बंदोबस्त तैनात असून वरिष्ठ पोलिसांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.

मनसे कार्यालयाबाहेर पोलिसांचा 24 तास बंदोबस्त तैनात असून 500 होमगार्ड, एसआरपीएफच्या दोन तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात आहे.

खबरदारी म्हणून पोलिसांनी पोलिस ठाणेनिहाय मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) नुसार नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना 4 ते 8 मेपर्यंत शहरात वास्तव्य करण्यास मनाई केली आहे. या आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या