ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन

0

पुण्यातील वाहतुकीच्या दुरवस्थेपासून ते देशाच्या प्रचलित घडामोडीपर्यंत आपल्या व्यंगचित्रांतून सहजपणे चिमटा काढून भाष्य करणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले.

मृत्यूसमयी त्यांचे वय ७८ होते. त्यांच्यावर आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पुण्यातील वाहतुकीची समस्या असो किंवा अन्य काही सामाजिक उपक्रम असो, तेंडूलकर यांचा त्यासाठी नेहमीच पुढाकार असे.

व्यंगचित्रासोबतच लेखन, नाटक या क्षेत्रातही त्यांनी मुशाफिरी केली होती.

आपल्या स्वत:वरच्या मृत्यूवरच त्यांनी एक व्यंगचित्र रेखाटले होते. त्यांच्या मृत्यूनंतर आज हे व्यंगचित्र सोशल मीडियावर पाहून अनेकांना भावना अनावर होत आहे.

भुईचक्र, संडे मूड, अतिक्रमण, कुणी पंपतो अजून काळोख अशी त्यांची निवडक ग्रंथसंपदा होती.

LEAVE A REPLY

*