नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम : आदिक

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयास एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे सर्वच क्षेत्रांत त्याचे दुप्षरिणाम दिसून आलेले आहेत. यामध्ये प्रमुख्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर फायद्यापेक्षा व्यापक नुकसान अधिक झालेले आहे. कमी उत्पन्न गटातील सामान्य जनता, व्यापारी, मध्यम वर्गीय अर्थव्यवस्थेवर अबलंबून होते. त्यंाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी केले.
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने केंद्र शासनाच्या नोटाबंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे सर्व सामान्य जनतेवर झालेल्या दुष्पपरिणामाबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष सुरेश ताके, शहर अध्यक्ष लकी सेठी, शहर महिला राष्ट्रवादी अध्यक्षा सौ.अर्चना पानसरे, नगरसेवक राजेद्र पवारल, रेश्मा गुलदगड, योगेश्‍वरी उंडे, राजश्री शिंदे, सुनील थोरात, भाऊसाहेब वाघ, कैलास बोर्डे, डॉ. विलास आढाव, आण्णा पंतगे, गणेश ठाणगे, गुरूचरण भटियाणी, निरजंण भोसले, निखील सानप, नरेंद्र हुडे, अर्जुन आदिक, मंगलसिंग साळुके, आदित्य आदिक, अनिरुध्द भिंगारवाला, सैफ पटेल आदि उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, कृषी मालाचे भावात मोठ्याप्रमाणावर घसरण झाल्यामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसलेला आहे. अचानक घेतलेल्या नोटाबंदीमुळे औद्योगिक क्षेत्रावर व लघुउद्योजकावर मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम झालेला आहे. सर्वत्र मंदीची लाट दिसून येत असून सर्वसामान्यांना रोजगार मिळणे अवघड झालेले आहे. तसेच व्यापारी, शेतकरी यांच्या उत्पन्नात घट झालेली आहे. रोखीने व्यवहार करणार्‍या गोरगरीब जनतेला नोटाबंदीमुळे दैनदिन चरितार्थ चालविणे अशक्य झाले. केद्र शासनाने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वच क्षेत्रात त्याचा वाईट परिणाम व त्याचा सर्वसामान्य जनतेला झालेला त्रास याचा श्रीरामपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने निवेदनात निषेध करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*