नोटाबंदी वर्षपूर्ती : जिल्हाभर सरकारविरोधात आंदोलन

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त विरोधकांकडून नगरसह जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले, राहाता, राहुरी, शेवगाव, पारनेर, संगमनेर, श्रीगोंदासह अनेक ठिकाणी नोटाबंदीच्या वर्षपूर्तानिमित्त निषेध नोंदवला गेला. राष्ट्रवादीसह अनेक संघटनांकडून नोटाबंदीचे वर्षश्राद्ध घालून सरकारी धोरणाचा निषेध करण्यात आला. काँग्रेसने काळा दिन पाळला.

काल 8 नोव्हेंबर 2017 ला मोदी सरकारच्या नोटाबंदीचा निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले. नोटाबंदीच्या निर्णयावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आश्‍वासित करतांना चलनातील खोट्या नोटा बाद होतील व अवैध मार्गाने कमाविलेला पैसा गोठला जाईल. देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊन गती मिळेल. कर्जाचे व्याजदर कमी होतील. देशातील गरिबी व दारिद्य्र संपेल अशी स्वप्ने दाखविले होते.

पण यात सर्वसामान्य शेतकरी व श्रमजीवी वर्ग मात्र या निर्णयाने भरडला गेला. याविरोधात निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री घुले, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, संजय झिंजे, दीपक सूळ, अमित खामकर, साहेबान जहागीरदार, गजेंद्र भांडवलकर, गहिनीनाथ दरेकर, दिलदारसिंग बीर, बाबासाहेब गाडळकर, प्रकाश भागानगरे, गौतम भांबळ, अ‍ॅड. वैभव मुनोत, भारत जाधव, हनीफ जरीवाला, फारूक रंगरेज, लकी खूबचंदानी, अण्णा दिघे, निर्मलाताई मालपाणी, भरत गारूडकर, दत्तात्रय राऊत, नीलेश भांगरे, अजिम राजे, मुसद्दिक मेमन सहभागी झाले होते.

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनंतर काळापैसा बाहेर न येता, जनसामान्यांना झालेला त्रास व जनतेला दिलेले आश्‍वासन खोटे ठरल्याच्या निषेधार्थ नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर काळ्याफिती लावून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी नगर तालुकाध्यक्ष

गहिनीनाथ दरेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुमारसिंह वाकळे, गजेंद्र भांडवलकर, अशोक कोकाटे, आबासाहेब सोनवणे, पापाभाई पटेल, रोहीदास शिंदे, सुभाष हिंगे, भाऊसाहेब काकडे, वैभव म्हस्के, विकास झरेकर, अक्षय भिंगारदिवे, अजय शेडाळे, युवराज सुपेकर, प्रविण येलुलकर, दादा शिंदे, सागर खेंगट उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी संघटना, प्रहार संघटना, अखिल भारतीय किसान सभा, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, राष्ट्र सेवा दल, शेतकरी संघटना, महानगर पालिका कामगार संघटना, क्रांतीसिंह कामगार संघटना, लाल बावटा विडी कामगार युनियन, हमाल पंचायत अशा विविध संघटनेनी वर्षश्राध्द घालून अजय महाराज बारस्कर यांचे या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नोटाबंदीवर किर्तन झाले.

या प्रसंगी अ‍ॅड.सुभाष लांडे, बहिरनाथ वाकळे, बन्सी सातपुते, बाळासाहेब पटारे, मेहबुब सय्यद, अ‍ॅड. सुधीर टोकेकर, शंकर न्यायपेल्ली, संध्या मेध्े, बुचम्मा श्रीमल, रामदास वाघस्कर, तुकाराम कांबळे, भारत आरगडे, भाऊसाहेब थोटे, युनूस तांबटकर, राजु शेख, अशोक सब्बन, आनंद लोखंडे, संजय खामकर, विजय केदारे, संतोष गायकवाड सहभागी झाले होते.

शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्जमाफी मुक्त करा. स्वामी नाथन आयोगाची अंमलबजावणी करा. सर्व शेती मालावरील निर्यात बंदी कामाची हटवा. साखरेच्या दरानुसार सन 2017-18 हंगामातील उसाला प्रती टन 3500 पहिली उचल जाहीर करा. 100 च्या वरील सर्व नोटा बाद करा. कामगार विरोधी कायदे रद्द करा. कृषि निविष्टावरील जी.एस.टी. संपूर्ण माफ करा. शेतकरी विरोधी कायदे रद्द करा. वाध्त्या महागाईला आळा घाला इत्यादी मागण्या करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

*