मुंबई : बाद नोटा ‘दान’पेटीत ; लालबागच्या राजाला 5 कोटीचे दान

0

5.8 कोटी रुपये, 5.5 किलो सोनं, 70 किलो चांदी

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजा गणपतीच्या दानपेटीत रद्द झालेल्या हजाराच्या 110 जुन्या नोटा सापडल्या आहेत.

या नोटांचं मूल्य थोडं थोडकं नाही तर तब्बल 1 लाख 10 हजार रुपये आहे.

25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या काळात, लालबागच्या राजाच्या दानपेटीत तब्बल 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली आहे.

रोख पैशांशिवाय लालबागच्या राजाना अनेक सोन्या-नाण्याचं दानही अर्पण करण्यात आलं आहे. या सोन्याचा आज लिलाव होणार आहे.

लालबागच्या दरबारात भक्तांनी भरभरुन दान दिलं आहे. यामध्ये रोख रकमेसह तब्बल 5.5 किलो सोनं आणि 70 किलो चांदीचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*