‘काळा दिवस’ : ८ नोव्हेंबरला काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

0

८ नोव्हेंबरला काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.

नोटाबंदीला म्हणजेच ८ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होईल,  काँग्रेसकडून हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येईल.  यानिमित्त काँग्रेसकडून संपूर्ण देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे.

मोदी सरकारच्या नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला, असा आरोप काँग्रेसने केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी ८ नोव्हेंबरला संध्याकाळी अचानकपणे नोटाबंदीची घोषणा करत ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचे जाहीर केले होते. या निर्णयामुळे देशभरात तब्बल महिनाभर चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे सामान्यांचे खूप हाल झाले होते. या पार्श्वभूमीवर सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने ८ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळायचे ठरवले आहे. त्यानुसार काँग्रेस नेते आणि प्रवक्ते देशभरात फिरून नोटाबंदीच्या दुष्परिणामांचा प्रचार करतील.

LEAVE A REPLY

*