Blog : स्मार्टफोनमधील नॉच डिस्प्लेचा ट्रेंड होतोय लोकप्रिय

0

मोबाईल कंपन्यांची वाढती स्पर्धा व नवीन नवीन फीचर्स देण्यासाठी चाललेली धडपड सध्या जोरात दिसून येत आहे.  मागील वर्षाच्या शेवटी ड्युअल रिअर कॅमेराचा ट्रेंड आपण अनुभवला होता.

या वर्षाच्या सुरवातीला फूल विव डिस्प्ले चा ट्रेंड आला.यात मोबाईलचा आकार न वाढता डिस्प्ले चा आकार वाढला.

डिस्प्ले वरती असणारे बटण हद्दपार पार झाले व मोबाईल धारकांना कमी साईजच्या मोबाईल मध्ये पूर्ण डिस्प्ले मिळू लागला. हा डिस्प्ले लोकांच्या पसंतीस उतरला व सर्व कंपन्या फुल विव डिस्प्ले देऊ लागल्या.

आता ट्रेंड आला आहे तो नॉच डिस्प्लेचा. सद्या सर्व कंपन्यांचा कल हा नॉच डिस्प्ले  देण्याकडे आहे.

 

काय आहे नॉच डिस्प्ले या बाबत सर्वांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. इअर स्पीकर, फ्रंट कॅमेरा व वेगवेगळे सेन्सर्स, मोबाईलच्या वरती एका छोट्याशा नॉच मध्ये म्हणजेच छोट्याशा जागेत ठेऊन बाकीचा पूर्ण भाग म्हणजे मोबाईल च्या अगदी कडांपर्यंत डिस्प्ले देणे.

यात तुम्हाला अगदी मोबाईल च्या कडां पर्यंत डिस्प्ले ( चित्र ) दिसणार आहे. यालाच म्हणतात नॉच डिस्प्ले.

सुरवातीला ऍपल च्या आय फोन१० ने नॉच डिस्प्ले ने दिल्यानंतर सॅमसंग वगळता सर्वच कंपन्या नॉच डिस्प्ले देऊ लागल्या आहेत. नॉच डिस्प्ले बाबत मतभिन्नता आहे, तर काहींचे म्हणणे आहे कि हा ट्रेंड जास्त दिवस राहणार नाही.

ते काहीही असो आज बहुतेक कंपन्या नॉच डिस्प्लेच्या मागे आहेत आणि वापरकर्त्यांमधील अनेकांना हा ट्रेंड आवडतो आहे. २०१८ साल हे नॉच डिस्प्ले च्या ट्रेंड चे राहणार हे निश्चित !

-निशांत पताडे

LEAVE A REPLY

*