Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

सहमतीने शारीरिक संबंध बलात्कार म्हणता येणार नाही – सर्वोच्च नायालयाची टिपण्णी

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

परस्पर सहमतीने शरीर संबंध ठेवल्यास तो बलात्कार होऊ शकत नाही अशी महत्वपूर्ण टिपण्णी आज सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.  शारीरिक संबंधांच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने म्हटले की, लग्नात असंख्य अडचणी येणार आहेत, किंवा काही कारणांमुळे लग्न होऊ शकत नाही हे माहिती असताना दोघांनीही परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवले तर त्याला बलात्कार म्हणू शकत नाही.

अशा परिस्थितीत शारीरिक संबंध ठेवल्यास त्याला लग्नाचं खोटं आश्वासन देऊन बलात्कार केला असं म्हणता येणार नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांनी विक्रीकर विभागात सहायक आयुक्त पदावर असलेल्या महिलेची याचिका फेटाळून लावली.

संबंधित महिलेने सीआरपीएफ अधिकाऱ्यावर केलेले बलात्काराचे आरोपही फेटाळून लावले. ‘दोघांचेही आठ वर्षांहून अधिक काळ प्रेमसंबंध होते. या काळात दोघांमध्येही परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवले गेले होते त्याला बलात्कार म्हणता येणार नाही अशी टिप्पणी आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!