Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश सार्वमत

विल्यम नॉर्डस, पॉल रोमरला अर्थशास्त्रातले नोबेल जाहीर

Share
स्टॉकहोल्म : अमेरिकन अर्थतज्ज्ञ विल्यम नॉर्डस आणि पॉल रोमर या दोघांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा झाली आहे. यंदा शांततेतील नोबेल आणि अर्थशास्त्रातील नोबेल कोणाला मिळते याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. हवामान बदल आणि आर्थिक विकासाबाबत केलेल्या संशोधनासाठी रॉयल स्विडीश अकॅडमी ऑफ सायन्सेसने सोमवारी (दि.८) या दोघांच्या नावाची नोबेलसाठी घोषणा केली.

डायनामाइटची निर्मिती करणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ साहित्य, शांतता, अर्थशास्त्र ,आरोग्य ,विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांना नोबेल पुरस्काराने सन्मानित केलं जातं. नॉर्डस आणि रोमर या दोघांनीही जागतिक हवामान बदलाची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो याचं संशोधन केलं आहे. या मोलाच्या कार्यासाठी त्यांना नोबेलने सन्मानित करण्यात आलं आहे.

या दोन्ही अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांना पुरस्काराच्या रुपाने ९० लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे ७.३५ कोटी रुपये) मिळणार आहेत. या दोघांना १० डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथे एका औपचारिक कार्यक्रमात या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. नोबेल पुरस्कारांची सुरुवात करणारे अल्फ्रेड नोबेल यांच्या जन्मदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!