Video : धुक्यात वाहन चालवताना सावधान! यमुना एक्स्पेस-वे वरील अपघाताचा व्हिडीओ होतोय व्हायरल

0
नवी दिल्ली : नोएडा येथे आज सकाळी दाट धुके पसरल्यामुळे यमुना एक्स्प्रेस हाय वे वर धुक्यामुळे १५-२० वाहने एका मागोमाग एक धडकून अपघातग्रस्त झाले. यात अनेकजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून अनेक ग्रुपमधून  हा व्हिडीओ पोस्ट केला जात आहे.

नवी दिल्ली परिसरामध्ये सकाळी आलेल्या दाट धुक्यामुळे यमुना एक्स्प्रेस वे वर दोन ठिकाणी असे अपघात झाले आहेत. यात सुमारे २०-२५ वाहने एकमेकांना धडकल्याचे समोर येत आहे.

दोन्ही घटनेत तब्बल २० जन जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातांची मालिका सुरूच असल्याची माहिती पोलीसांना लागल्यानंतर वाहतूक पोलीस याठिकाणी दाखल झाले असून मदतकार्य सुरु केले.

काही वेळाने महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.  या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात सर्वत्र व्हायरल झाला असून अनेक ग्रुपमध्ये सध्या पोस्ट केला जात आहे.

 

LEAVE A REPLY

*