प्राचार्यांकडून नोडल अधिकार्‍यांच्या नियुक्त्या

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा निवडणूक विभागाने युवक मतदार नोंदणीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार 28 रोजी बोलाविलेल्या बैठकीकडे महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी पाठ फिरविली. सार्वमतमध्ये प्राचार्यानी उपजिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीला मारली दांडी या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द होताच.नगर शहरातील सर्वच प्राचार्यानी वृत्ताचा धसका घेत नोडल ऑफीसर नियुक्तीचे कार्यवाही सुरु केली आहे.
महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिये दरम्यान 18 ते 21 वयोगटातील युवक-युवतींची मतदार यादीत नावनोंदणी करण्याबाबत निवडणूक विभागाची निर्देश आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाने संबधीत महाविद्यालय व प्राचार्यांना नोडल अधिकारी नियुक्ती करण्यांच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र न्यू आर्टस कॉलेज वगळता इतर महाविद्यालयांनी याकडे कानाडोळा करणे पसंत केले. मतदार नोंदणी कामाकडे दुर्लक्ष करणार्‍या महाविद्यालयाकडून अपडेट माहिती उपलब्ध न झाल्याने निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरूण आनंदकर यांनी बुधवारी सकाळी नगर शहरातील प्राचार्यांची बैठक आयोजित केली होती.
यावेळी प्राचार्यांनी स्वत उपस्थित न राहता मात्र,आपल्या प्रतिनिधींना पाठविले होते.दरम्यान अनेकांनी अद्यावत माहिती बरोबर न आणताच अद्याप नोडल अधिकार्‍यांची नियुक्तीही केली नव्हती. वारंवार सूचना देवूनही कार्यवाही न करणार्‍या प्राचार्यानी महत्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त होवून उपजिल्हाधिकार्‍यांनी प्राचार्याच्या गैरहजेरीची दखल घेतली.
यापुढे कार्यवाही न झाल्यास कारवाईचा ईशारा दिला होता.निवडणुक आयोग 1 ते 31 जुलै या कालावधीत 18 ते 21 वयोगटातील युवकांची मतदार यादीत नावनोंदणीसाठी विशेष मोहिम राबवित आहे. वय पूर्ण असतांना मतदार यादी नसणार्‍या विद्यार्थ्यांच्या नावाची यादी तयार करण्याचे सूचीत केले आहे. संबधीत सर्वाचा नमुना नंबर 6 भरुन घेण्यात येणार आहे.
त्या सोबत जन्म तारखेचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, तहसिलदार यांच्याकडील अधिवास प्रमाणपत्र, सर्वसाधारण रहिवासाचा पुरावा (बँक पासबुक, पोस्टाचा पत्याचा पत्ता, वीज/दुरध्वनी बील) आदी कागदपत्रे आवश्यक आहे.
ज्या विद्यार्थ्याचे सर्वसाधारण रहिवास 128 शिर्डी विधानसभा मतदार संघात असल्यास त्यांचा केवळ नमुना नंबर 6 भरुन घेण्यात यावा. इतर विद्यार्थ्याना त्यांचा रहिवास ज्या मतदार संघात असेल त्या त्या मतदार संघाचे अधिकारी यांच्याकडे संबधित फॉर्म सादर करण्याच्या सूचना महाविद्यालय स्तरावर देण्याच्या सुचना देण्यात येत आहेत.

कारवाई नको, काम करतो प्राचार्याचे अधिकार्‍यांना पत्र –
महत्वाच्या विषयासाठी बोलाविलेल्या बैठकीला गैरहजर राहणार्‍या प्राचार्यानी अखेर झालेली चूक मान्य करत अनेकांनी उपजिल्हाधिकार्‍यांच्या नावे पत्र पाठवून खुलासा केला.तर, काहींनी प्रत्यक्ष भेट व फोन केले.आमच्यावर कारवाई करु नका,तात्काळ कार्यवाही करतो.असा निरोप प्रचार्यानी पाठविला असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.

दोन वर्ष शिक्षेची तरतूद –

राज्य निवडणूक विभागांने दिलेल्या निर्देशानुसार संबधीत महाविद्यालयांनी मतदार नोंदणी मोहिमेत सहभागी होऊन युवकांची नोंेदणी करणे अपेक्षित आहे. दुर्लक्ष केल्यास लोकप्रतिनिधी कायदा कलम 32 नुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन संबधीतांना दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते.
– अरूण आनंदकर, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग 

 

LEAVE A REPLY

*