नियोजनाच्या अभावाने शिर्डी हैद्राबाद विमान उड्डाण रद्द

0
राहाता (तालुका प्रतिनिधी) – शिर्डी विमानतळावरून उद्घाटनानंतर दुसर्‍याच दिवशी नियोजनाच्या अभावानेच शिर्डी हैद्राबाद विमान रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेले शिर्डी चे विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण पार पडल्यानंतर दुसर्‍याच दिवशी एअर अलायन्स कंपनीचे शिर्डी हुन हैदराबाद कडे जाणार्‍या विमानाचे उडाण रद्द करण्याची वेळ कंपनीवर आली.
प्रवासी आणि लगेज यांच्यात समनव्य न लागल्याने अखेर हे विमान अंधुक प्रकाशामुळे रींल च्या आदेशानुसार उडड्ाण रद्द करावे लागले. सर्व प्रवाशांची राहण्याची व्यवस्था विमान कंपनीला करावी लागणार असून हैद्राबाद कडे जाणारे विमानात 52 प्रवासी होते. शिर्डीतील विविध हॉटेल मध्ये या प्रवाशांची राहण्याची व्यवस्था विमान कंपनीने केली असल्याची माहिती प्राप्त झाली असून नेमकं कोणत्या ठिकाणावर प्रवाशांना ठेवण्यात आले याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.
आज सकाळी दहा वाजे नंतर या प्रवाशांना विमानाने हैद्राबाद कडे रवाना करण्यात येणार आहे. याबाबत विमानतळ सुत्रांकडून मिळालेली माहीतीनुसार रात्री उशीरा सर्व प्रवाशाना शिर्डीत पाठविण्यात आले. विमान रद्द झाल्याची माहीती मिळताच अनेक नागरिकांनी विमानतळ परिसरात काय झाले याची विचारणा करण्यासाठी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

*