लोकपाल नियुक्तीची गरज नाही : खासदार स्वामी

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात सर्वोच्च न्यायालयासारखी मोठी न्याय व्यवस्था आहे. त्यामुळे लोकपाल बिलची गरज नाही, असे मत जेष्ठ विधीज्ञ खासदार डॉ. सुब्रह्यण्यम् स्वामी यांनी व्यक्त केले.
पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने पं. दीनद्याळ उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने पंडित दीनदयाळ व्याख्यान मालाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जैन ओसवाल पंचायत समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, उपस्थित होते.
खा. डॉ. सुब्रह्यण्यम् स्वामी म्हणाले, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना दगा दिला आहे. हजारे यांचे नैतिक अस्तित्व आता राहिले नाही. त्यांच्याकडे कोणीही लक्ष देण्याची गरज नाही. भाविष्यात राम मंदिरा बाबत न्यायालयाचा निकाल लागल्यास नक्कीच 2018 मध्ये राम मंदिर उभे राहिल, असे ते म्हणाले.

राहुल गांधींना फक्त अर्वाच्च भाषाच वापरता येते. त्यांना कोणत्याच विषयावर नीट बोलता येत नाही. तसेच सोनिया गांधी यांच्यावर मोठे भ्रष्टचाराचे आरोप आहे, त्यामुळे या दोघांना गुजरातमध्ये कोणतेच स्थान नाही, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*