गैरव्यवहार न झालेल्या सोसायट्यांनाच यापुढे सरकारची आर्थिक मदत

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील अल्प मुदत सहकार पतसंरचनेअंतर्गत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने काही पावले उचलली असून ज्या संस्थांमध्ये अफरातफर, गैरव्यवहार झाला असूल आणि व त्याची वसुली झाली नसेल अशा संस्थाच अर्थसहाय्यास पात्र ठरणार आहेत.

प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना देण्यात येणारे अर्थसहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी काही निकषांची पुर्तता करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता यासंदर्भात पुन्हा परिपत्रक जारी करण्यात येऊन काही सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत.  लेखापरीक्षण अहवालानुसार संस्थेत अफरातफर किंवा गैरव्यवहार झाला असल्यास, व त्याची वसुली झाली नसल्यास अशा संस्था अर्थसहाय्यास अपात्र ठरणार आहेत.

ज्या संस्थांमध्ये मागील लेखापरीक्षण कालावधीत अफरातफर, गैरव्यवहार झाले असतील पण त्याबाबतीत कायदेशीर कारवाई झाली असेल व रक्कम वसुल झाली असेल आणि अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर केलेल्या वर्षातील लेखापरीक्षण अहवालात कोणतीही अफरातफर, आर्थिक गैरव्यवहार नसतील अशा संस्थाच अर्थसहाय्यास पात्र ठरणार आहेत.

तसेच शासनाने ज्या हंगामासाठी व ज्या जिल्ह्यात 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर केली ओह. अशा जिल्ह्यासाठी पीककर्ज वसुलीचे प्रमाण किमान 30 टक्के असणे आवश्यक आहे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.  

 

LEAVE A REPLY

*