सेलिब्रिटींच्या पार्टीत कंगनाला ‘नो एण्ट्री’

0

अभिनेत्री कंगना रणौतने वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखती तिच्या सामाजिक जीवनात अडथळा ठरत आहेत. अनेकांनी तिच्याकडे पाठ फिरवली आहे. चित्रपटसृष्टीतील काही बहुप्रतिष्ठित सेलिब्रिटींच्या पार्टीतून कंगनाला डावलल्याचे दिसून येत आहे.

अभिनेता डिनो मोरीया आणि नंदिता महतानी यांनी मिळून गेल्या वर्षी एक प्लेग्राऊंड लाँच केले होते. या प्रोजेक्टला एक वर्ष पूर्ण होणार असून त्यातून मिळालेले यश साजरा करण्यासाठी या दोघांनी २८ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ‘फोर सिझन्स हॉटेल’मध्ये या ग्रँड पार्टीचे आयोजन केले आहे. यामध्ये चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांना निमंत्रित केले गेले. गेल्या वर्षी हा प्लेग्राऊंड जेव्हा लाँच झाला, त्यावेळी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये कंगना उपस्थित होती. मात्र यावर्षी तिला निमंत्रित करण्याचे डिनो आणि नंदिताने टाळले.

या पार्टीमध्ये हृतिक रोशन, करण जोहर, रणबीर कपूर, अर्जुन रामपाल, मलायका अरोरा, अभिषेक बच्चन, राज कुंद्रा आणि अरबाज खान यांचा समावेश आहे.

 

LEAVE A REPLY

*