Video ; नाशिकमध्ये सध्या कुठलीही नवी पॉझिटिव्ह केस नाही; घाबरून जाऊ नका

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये नवे सहा कोरोना बाधित रुग्ण आढळल्याची आज दुपारी चुकीची माहिती पसरली होती.  मात्र, नाशिकमध्ये केवळ एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. इतर  कुठलेही सहा रुग्ण आढळून आलेले नाहीत. नाशिककरांनी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ नितीन सैंदाणे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली.

ते म्हणाले, कोरोना संशयितांचे सहा नमुने पॉझिटिव्ह आले असल्याची अफवा नाशिकमध्ये पसरली होती. मात्र, ही निव्वळ अफवा असून कुन्हीही या अफवेला बळी पडू नये.

नाशिकमध्ये कुठलेही सहा रुग्ण पॉझिटिव्ह नाहीत. काल धुळे वैद्यकीय महाविद्यालयात येथे जे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत त्यांचे अद्याप रिपोर्ट मिळालेले नाहीत.  हे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर प्रशासनातर्फे कळविले जाईल. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

कुठलीही नवीन केस नाही

जिल्ह्यामध्ये नवीन कोणतीही पॉझिटिव्ह केस आढळून आलेली नाही. जुनी एकच पॉझिटिव्ह आहे व त्या पेशंटची तब्येत व्यवस्थित आहे.  यासंदर्भात वार्तांकन करण्यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक अथवा माझ्याशी बोलल्याशिवाय कृपया परस्पर कोणतेही बातमी देऊ नयेत. विनाकारण लोकांमध्ये संभ्रम व भीती निर्माण होत आहे.

सुरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *