महापालिकेकडून कचरा डिकंपोस्ट करण्याच्या सूचना

मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेलमधील कचर्‍याचा भार होणार कमी

0
नाशिक | दि.११ प्रतिनिधी- देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिक शहराचे नाव खाली गेल्यानंतर आता महापालिका आयोग्य विभागाकडून झालेल्या चुका दुरूस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याच पार्श्‍वभूमीवर आता शहरातील मंगल कार्यालये, लॉन्स व हॉटेल यांचा कचरा याच ठिकाणी डिकंपोस्ट करण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

यामुळे आता हॉटेल व मंगल कार्यालये, लॉन्समधील कचरा उचलण्याचा आरोग्य विभागावरील भार कमी होणार असून यासाठी वापरल्या जाणार्‍या घंटागाड्या आता इतर ठिकाणी वापरल्या जाणार आहेत.
नाशिक शहरातील विविध भागात घंटागाडी अनियमित येत असल्याच्या तक्रारी कायम आहेत. त्याचबरोबर घंटागाडीत ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी जागाच नसल्याने ठेकेदारच कचरा वर्गीकरण करीत नसल्याचे समोर आले आहे. तसेच घंटागाडी कमी पडल्यास जादा वाहने लावण्याची जबाबदारी ठेकेदारांवर टाकण्यात आली आहे.

यात अनेक ठेकेदारांचे घंटागाडी कर्मचारी हे हॉटेलमधील कचरा घेण्यासाठी प्रामाणिक काम करीत असल्याचे दिसत असून वेळ सोडूनही हॉटेलजवळ घंटागाडी दिसत असते. या ठिकाणी या कर्मचार्‍यांना पैसे मिळत असल्याने ते न चुकता हॉटेलमधील कचरा उचलत असल्याची चर्चा आहे.

अशाच प्रकारे शहरातील मंगल कार्यालये व लॉन्समधील कचरा उचलला जातो. याकरिता ठेकेदारांची अनेक वाहने यात अडकली जातात. याच पार्श्‍वभूमीवर आता महापालिकेकडून मंगल कार्यालये, लॉन्स व हॉटेलमधील कचरा याचे त्यांनी त्याच ठिकाणी डिकंपोस्ट करून त्याचा कचरा तयार करावा, अशा सूचना देण्यात येणार आहेत.

त्यामुळे लवकरच आता यात अडकलेल्या घंटागाड्या मोकळ्या होणार असून कचरा उचलण्याचा भारदेखील कमी होणार आहे.  नाशिक शहरात नवीन घंटागाडी ठेका देण्यात आल्यानंतर ठेकेदारांसोबत महापालिकेने केलेल्या करारनाम्यात अनेक महत्त्वपूर्ण अटी- शर्ती घातल्या आहेत. यातील बहुतांशी अटी-शर्तींचा भंग होत असताना आरोग्य अधिकार्‍यांकडून ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम केले जात असल्याचे उघडकीस आले आहे.

यात अलीकडेच महापौर रंजना भानसी व उपमहापौर प्रथमेश गिते यांनी गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर यांची गंभीर दखल आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी घेतली असून यासंदर्भातील अहवाल आरोग्य विभागाकडून तातडीने मागवला आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडून शहरातील २७ घंटागाड्यांत कचरा वर्गीकरणाची जागा नसल्याचा अहवाल

आयुक्तांना देण्यात आला असून हॉटेल, मॉल, पालापाचोळा व डेब्रीज करीत या घंटागाड्या वापरल्या जात असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून अशाप्रकारे अहवाल देण्यात आला असला तरी प्रत्यक्ष पंचवटी व नवीन नाशिक भागातील घंटागाड्यांची पाहणी केल्यास आरोग्य विभाग ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचे समोर येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आरोग्य अधिकार्‍यांचा जावई शोध अन् वास्तव
शहरातील अनियमित घंटागाडीबाबत असलेली ओरड आणि कचरा वर्गीकरणावरून आरोग्य विभागाबाबत तीव्र प्रतिक्रिया शहरात उमटल्या आहेत. यासंदर्भात प्रसार माध्यमांनी आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना घंटागाडी करारनाम्यात ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत विचारणा केली. त्यावेळी डॉ. डेकाटे यांनी करारनाम्यात ओला व सुका कचरा वर्गीकरणाची तरतूद नाही, असे सांगताना विघटनशील व अविघटनशील असा उल्लेख असल्याचे सांगितले. त्यावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी करारनाम्यात ओला व सुका कचर्‍याचा उल्लेख असल्याचे दाखवून दिले.

LEAVE A REPLY

*