Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याअस्वच्छता करणाऱ्यांकडून मनपाने केला इतका दंड वसूल; महसुलात भर

अस्वच्छता करणाऱ्यांकडून मनपाने केला इतका दंड वसूल; महसुलात भर

नाशिक । प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षापासुन केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षणात पहिल्या दहा स्वच्छ शहरात येण्यासाठी नाशिक महापालिकेची मोठी धडपड सुरू आहे. मागील वर्षात पहिल्या दहात येण्याचा नंबर हुकल्यानंतर आता पुन्हा एकदा जोरदार तयारी झाली असुन शहर स्वच्छतेसंदर्भात गेल्या आठ महिन्यात मोठी कारवाई करीत 17 लाख 46 हजार 20 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. यात सर्वाधिक दंड मास्कसंदर्भात वसुल झाला आहे…

- Advertisement -

देशातील स्वच्छ शहराच्या यादीत नाशिक महानगरपालिकेचा अकरावा व राज्यात दुसरा क्रमांक आल्यानंतर आता मनपा प्रशासनाने मनोबल वाढले असुन यावेळी देशात पहिल्या 10 क्रमांकात येण्याची तयारी आयुक्त कैलास जाधव यांनी केली आहे. यादृष्टीने अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येऊन काम केले जात आहे.

शहरात बांधकामाचा मलब्यामुळे निर्माण होत असलेली अस्वच्छता व यासंदर्भात विल्हेवाट व्यवस्थापन होत नसल्याने नाशिक शहराला कमी गुण मिळाले होते, आता ही त्रुटी दूर करण्याचे काम प्रशासनाने केले आहे. तसेच स्वच्छतेसंदर्भात मोठी दंडात्मक कारवाई मनपाने सुरू केली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2020 या कालावधी घन कचरा व्यवस्थापन विभागाकडुन झालेल्या कारवाईत मोठा महसुल जमा केले आहे.

घन कचरा व्यवस्थापन विभागाची कारवाई

विषय कसेस दंडाची रक्कम

कचरा विलगीकरण न करणे 265 1,70,100

सार्व. ठिकाणी अस्वच्चता 342 3,72,520

पाळीव प्राणी अस्वच्छता 40 10,440

बांधकाम मलबा अस्वच्छता 96 1,89,640

प्रतिबंधीत प्लास्टीक वापर 46 2,45,000

कचरा जाळणे 6 30,000

बायो मेडीकल वेस्ट 2 15,000

- Advertisment -

ताज्या बातम्या