Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : महापालिका सभागृह नेतेपदी सोनवणे; पाटील भाजपा गटनेते

Share
  • पाटील यांना ठिय्या आंदोलन भोवले ; मोरुस्कर यांचे पद काढले

नाशिक ।  प्रतिनिधी

महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेनंतर सभागृहात सलग तीन दिवस ठिय्या आंदोलन करणारे भाजप सभागृह नेते दिनकर पाटील यांच्यावर पक्षाने कारवाई करीत त्यांचे पद काढले आहे. पाटील यांच्या जागी सतिश (बापु) सोनवणे यांची आणि भाजपा गटनेते पदी जगदिश पाटील यांची नियुक्ती पक्षाकडुन करण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाने पत्र दिल्यानंतर ही निवड झाल्यानंतर उभयताचा सत्कार महापौर रंजना भानसी यांनी महापौर दालनात केला. दरम्यान या नवीन पदाधिकार्‍यांच्या नावाचा अधिकृत घोषणा महासभेत महापौरांकडुन केली जाणार आहे.

महापालिका सत्तेत असलेल्या भाजपा पदाधिकार्‍यांती बेबनाव अनेक वेळा उघडकीस आला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरुध्द अविश्वास आणल्यानंतर पक्षात दोन गट पडुन हा अविश्वास ठराव मागे घेण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपात दोन मत प्रवाह समोर आल्यानंतर महासभेत राज्य शासनाशी संबंधीत तीन विषय महासभेच्या पटलावर आणण्याचे काम झाले होते.

हाच धागा पकडीत सभागृह नेते दिनकर पाटील यांनी धार्मिक स्थळे, मिळकतीवरील कारवाई व भाडेपट्टा, महिला बचत गटांना विद्यार्थी आहार देण्याचे काम देणे व नवीन नाशिकसाठी बांधकाम परवानगी देणेबाबत अशा विषयावर निर्णय जोपर्यत ठोस निर्णय दिला जात नाही, तोपर्यत सभागृहात ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

आपले आंदोलन पक्षाविरुध्द नसुन ते प्रशासनाच्या विरोधात असल्याचे सांगत पाटील यांनी सलग तीन दिवस आंदोलन सभागृहात सुरू ठेवले होते. या आंदोलनाला राष्ट्रवादी कॉग्रेस व मनसेनेसह शहरातील सामाजिक संस्थां व नागरिकांनी पाठींबा दिला होता. या मुळे सत्ताधारी भाजप अडचणीत आल्याने याची दखल भाजप प्रदेश कार्यकारीणीकडुन घेण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर अखेर भाजपाकडुन पाटील यांच्या जागी सभागृह नेते सतिश सोनवणे व संभाजी मोरुस्कर यांच्या जागी भाजपा गटनेते पदी जगदिश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भातील पत्र महापौरांना मिळाल्यानंतर आज नवनियुक्त पदाधिकारी सोनवणे व पाटील यांचा महापौर रंजना भानसी यांनी सत्कार केला. याप्रसंगी उपमहापौर प्रथमेश गिते यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!