Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक : भाजपचे स्थायी समिती सदस्य अज्ञात स्थळी रवाना

नाशिक : भाजपचे स्थायी समिती सदस्य अज्ञात स्थळी रवाना

नवीन नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिकेची स्थायी समिती सदस्य निवड व नंतर सभापती निवड यावरुन सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपने सभपती निवडीच्या पार्श्वभूमीवर आपले सदस्य आणि नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना केले आहेत.

- Advertisement -

लवकरच नाशिक महापालिकेची स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक होणार आहे. दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे संख्याबळ जवळपास समप्रमाणात आहे. त्यामुळेबंडाळी टाळण्यासाठी स्थायी समितीच्या सदस्यांना गुजरात राज्यात सहलीला पाठविण्यात आले असल्याचे समजते.

स्थायी समिती सदस्य निवडीच्या दिवशी भाजप नगरसेविका प्रियांका घाटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजप स्थानिक लोकप्रतिनिधीसह स्थानिक नेत्यांवर आगपाखड करत राजीनामास्र उगारले होते. त्यामुळे भाजपमधील एक गट नाराज झाला आहे. यापार्श्वभूमीवर सदस्य अज्ञात स्थळी पाठविण्यात आल्यामुळे सभपती पदी कोणाची वर्णी लागणार यावरील चर्चांना उधान आले आहे.

अज्ञात स्थळी ज्या सदस्यांना पाठविण्यात आले आहे त्यामध्ये डॉ. वर्षा भालेराव, राकेश दोंदै, कमलेश बोडके, हेमंत शेट्टी, स्वाती भामरे, गणेश गिते, शरद मोरे, सुप्रिया खोडे व  रूपाली निकुळे यांचा समावेश आहे. यांच्यासोबतच माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके आहेर यादेखील फोटोमध्ये दिसून येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या