नागरिकांच्या विरोधात द्वारका परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली

0

जुने नाशिक (प्रतिनिधी) ता. १४ : उच्च न्यायालयाच्या आदेशाने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याची नाशिक महापालिकेची मोहीम आज सलग सहाव्या दिवशीही सुरू आहे.

आज सकाळी द्वारका परिसरातील जाकीर हुसेन रुग्णालयाला लागून असलेल्या धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्यात आले.

यावेळी नागरिकांनी विरोध केला. तसेच त्यांची पोलिस आणि मनपा अधिकाऱ्यांसोबत बाचाबाचीही झाल्याने काही काळ येथे तणाव होता.

मात्र तरीही हे अतिक्रमण अखेर काढले. यावेळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात होता. दुपारी काठेगल्ली परिसरातील अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू झाली.

नानावली परिसरातील चार अनधिकृत धार्मिक स्थळे मनपाने काढली. यावेळी मोठा जमाव जमला होता. या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान जुन्या नाशकातील भद्रकाली मंदिर आणि इतर चार धार्मिक स्थळांचे अतिक्रमणासंदर्भात न्यायालयाने २७ पर्यंत स्थगिती दिली आहे.

LEAVE A REPLY

*