शहरातील अनधिकृत होर्डिंग विरोधात मनपाची कारवाई

0
नाशिक | शहरात वर्दळीच्या ठिकाणी अनेक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांचे अनधिकृत होर्डिंग लागलेले होते. आज दुपारी नाशिक महानगरपालिकेकडून हे सर्व होर्डिंग काढण्यात आले. होर्डिंग काढल्यामुळे एमजीरोड, मेन रोड, वकीलवाडी परिसराने मोकळा श्वास घेतला.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी अनेक राजकीय पक्षाची कार्यालये आहेत. कुणी नेता याठिकाणी येत असला की याठिकाणी स्वागत करणारे, शुभेच्छा देणारे अनधिकृत होर्डिंग लावले जातात. यामुळे वाहतुकीत अडथळा येतो.

अनेकदा अपघातांनादेखील यामुळे निमंत्रण मिळते. वेळोवेळी परिसरातील नागरिक  कारवाई करण्याची मागणी देखील करतात.

आज मनपाकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून याठिकाणी पुन्हा अशी होर्डिंगबाजी करणाऱ्या नेत्यांवरच कारवाई केली जावी असेही बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

*