Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

निवेकच्या पहिल्या ट्रायथलॉन स्पर्धेचे अनुज उगले व अनुजा उगले विजेते

Share

सातपूर । प्रतिनिधी

निवेक अशोका ओपन 2020 या उपक्रमांतर्गत रविवारी (दि26 जानेवारी)नाशिकला पहिल्यांदा ‘ट्रायथलॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत 25 ते 30 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. निवेक अशोका ओपन-2020 यांच्या आयोजनातून व नाशिक सायकलिस्ट असोसिएशन व अ‍ॅक्टीव एनआरजी यांच्या सहयोगाने या स्पर्धा निवेक येथे पहिल्यांदा घेण्यात आल्या.

या स्पर्धेत 750 मीटर स्वमींग, 20 की.मी.सायकलींग व 5 की.मी धावणे हे सर्व प्रकार सलगपणे पूर्ण करणे आपेक्षित होते. या स्पर्धांची सूरूवात निवेकच्या प्रांगणांत करण्यात आली. शुभारंभ सरयु जयसिंघानी, रतन लथ, गोल्डी आनंद, डॉ. अनिरुध्द धर्माधिकारी, आर्यनमॅन महेंद्र छोरीया, प्रशांत डबरी, डॉ. अरुण गचाले, किशोर घुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी निवेक अध्यक्ष संदिप गोयल, उपाध्यक्ष जनक सारडा, सरचिटणिस रणजित सौंध, पंकज खत्री, अनिरुद्ध अथनी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेचा शेवटही निवेक येथे करण्यात आला.

या स्पर्धेत पूरूष गटात अनूज उगले (1:16:21)हा विजेता ठरलेला आहे. तर निलेश झवर (1:21:11)यांना दूसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिला गटातून अनूजा उगले (1:24:25)ही विजेता ठरली आहे. तर निता नारंग (1:51:37)यांना दूसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

निवेक तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 10 कि.मी.च्या मॅरेथॉन स्पर्धेत पूरूष गटात रामदास सोनवणे(47:08) हे विजेते ठरले. तर सुनील सिंग(49:02) हे उपविजेते ठरले. 10 कि.मीच्या महिला गटात प्राजक्ता काटकर (1:05:26) या विजेते ठरल्या तर सुपर्णा मंडाले (1:06:59) यांना दूसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

यासोबतच 5 कि.मीच्या मॅरेथॉन स्पर्धेत पूरूष गटात शौर्य वीर(37:07) हे विजेते ठरले. तर वैभव शिंदे (33:45) हे उपविजेते ठरले. 5 कि.मीच्या मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात स्मिता वाकचौरे (36:37) या विजेते ठरल्या तर मिनल पटेल (45:36) यांना दूसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.दरम्यान ज्येष्ठ उद्योजक नरेंद्र गोलीया यांच्या हस्ते बॉक्स क्रिकेट स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी निवेक अध्यक्ष संदिप गोयल, उपाध्यक्ष जनक सारडा, सरचिटणिस रणजित सौंध, पंकज खत्री, अनिरुद्ध अथनी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

निवेक मैदानी क्रिकेटला प्रतिसाद

निवेक तर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेला नुकताच प्रारंभ झाला. पहिल्या दिवसाच्या सामन्यात निवेक व एनसीए या दोन संघात सामना रंगला.निवेकने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंंदाजी घेतली होती.एनसीए संघाने 20 षटकांत 8 गडी गमावत 130 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना निवेकचा संघ 109 धावांतच गारद झाला. या स्पर्धेत प्रमोद नराळे यांना मॅन ऑफ द मॅच पूरस्कार देण्यात आला. दुसर्‍या सामन्यात एनएसएफए व जिमखाना या दोन संघात सामना रंगला.जिमखानाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंंदाजी घेतली होती.जिमखाना संघाने 20 षटकांत 5 गडी गमावत 175 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना एनएसएफएचा संघ 148 धावांतच गारद झाला. या स्पर्धेत आसिफ सय्यद यांना मॅन ऑफ द मॅच पूरस्कार देण्यात आला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!