निवेक जलतरणपटूंची मॉडर्न पॅटथलॉन चॅपियनशीपसाठी निवड

0
सातपूर । एम.पी.एफ आयच्या वतीन 12 ऑगस्ट रोजी शिवछत्रपती स्पोटर्स कॉम्लेक्स, बालेवाडी, पुणे येथेे आयोजीत करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये खालील स्पर्धकांची8व्या मॉडर्न पॅटथलॉन चॅम्पियनशिपसाठी निवड करण्यात आलीे.

एकाच वेळी धावणे, पोहणे, धावणे अशा पध्दतीने ही स्पर्धा घेतली जाते. यात विविध वयोगटांचा समावेश असतो.या स्पर्धेत निवेकच्या निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये आदित्य ब्राम्हणकर, लब्ध खिंवसरा, प्रविण देशपांडे, ओम अग्रवाल, यश बनछोडे, वेदिका सालसिंगकर, परिसा बंग, श्रीया सुर्यवंशी, मीरा जाधव, हिग्नेश जसवानी, श्रीरंग जोशी, नील राणे, आदित्य कुंवर, प्रतिक बंग, वैभवी देसाई, मनप्रीत गायकवाड, प्रितम शहा, आर्य साखरे, कृषीराज भगत, वरंद तावडे, सोहम खाडीलकर यांची निवड करण्यात आली.

तर मास्टर गटात हिरेन बुझरूक यांची निवड करण्यात आली. हे सर्व खेळाडू निवेक येथे प्रशिक्षक हिरेन बुझरूक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.

या सर्व जलतरणपटंचे माजी अध्यक्ष रमेश वैश्य, क्रीडा सचिव रणजित सिंग, स्विमिंग पूल चेअरमन अशोक हेंबांडे, अशोक रेंडे, श्री.निकम, श्री. बोरसे, श्री.सदगुणे व तरण तलाव कर्मचारी आणि पालक वर्गाने त्यांचे कौतूक केले.

LEAVE A REPLY

*