Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : निवेक कार्निवाल : चिमुकल्यांची मनोरंजनात्मक व सृजनात्मक मैफिल

Share

सातपूर । प्रतिनिधी

निवेक कार्निवाल मधील विविध उपक्रमांत क्यूब कॅटल प्रिंटिंग, पेंटिंग अम्ब्रेला, पेंटिंग, टॅटू, झुंबा सेशन, कराओके, जम्पिंग जॅक, अँग्री बर्ड एडवेंचर, डार्ट गेम, टॉस द गेम, बबल शो गेम, गणपती पेंटिंगमध्ये सहभाग घेताना मुलांचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. निमित्त होते फन फेअर सारख्या व्यवसांयीक संकल्पनेला फाटा देत खास मुलासाठी त्याच्या सृजनात्मक उपक्रांसाठी शनिवारी आयोजित केलेल्या ‘निवेक कार्निवाल’चे.

वातावरणातील उत्साह, आयोजनाचे निटनेटके पण आणि मुलांचा आनंद याने निवेक क्लबमधिल मागचा शनिवार वेगळा ठरला. याबाबत बोलताना निवेक अध्यक्ष राजकुमार जोली व कल्चरल कमिटी अध्यक्ष जनक सारडा म्हणाले की, मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देताना ‘निवेक कार्निवाल’ ही संकल्पना व्यवसायिक फन फेअरला फाटा देत मुलाच्या सृजनात्मक व मनोरंजनात्मक वृत्तीला चालना देणारी असावी असा उद्देश होता. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंग व रितू गोयल यांच्या हस्ते करण्यात आला.

या ‘निवेक कार्निवाल’मध्ये एकूण साडेचारशे चिमुकले व त्यांच्या मातानी सहभाग नोंदवला होता.मुलांना त्यांच्या पारंपरिक वातावरणात नेऊन स्वतःच्या कल्पकतेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम होता या ठिकाणी मुले स्वतः स्टॉल लावून विविध खेळ मांडून बसले होते त्यात प्रामुख्याने क्यूब कॅटल प्रिंटिंग, पेंटिंग अम्ब्रेला, पेंटिंग, टॅटू, झुंबा सेशन, कराओके, जम्पिंग जॅक, अँग्री बर्ड एडवेंचर, डार्ट गेम, टॉस द गेम, बबल शो गेम, गणपती पेंटिंग, हेअर बिल्डिंग, फुड स्टॉल, स्माईल मेकिंग टिटोरियल, कप केक फ्रोस्तींग टिटोरियल यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन केले होते यासोबतच 300 ढोल मुलांना वाजवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. या उपक्रमाचा मनसोक्त आनंद घेताना निवेक क्लब च्या लॉनवर लहान मुलांची जणू जत्राच भरली होती.

निवेक क्लब सुमारे 1900 सभासदांचा क्लब आहे याठिकाणी विविध खेळ व्यायाम प्रकार आहेत. निवेकने पहिल्यांदा कार्निवालच्या रूपाने निवेकला स्पोर्ट्स सोबत फॅमिली क्लब करण्याच्या दिशेला वाटचाल सुरू केली आहे या उपक्रमाचा समारोप लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक सुनील कडासने यांच्या हस्ते करण्यात आला.

‘निवेक कार्निवाल’च्या आयोजनामध्ये सारा सोनार, साएना नुराणी, सबाह नुराणी, रणजितसिंग सौंध यांच्यासह सारिका वैश्य, जिया खत्री, स्वाती सोनार, चांदनी धाम, रिद्धि सारडा यांंनी सहभाग घेतला. तसेच आतिश पवार ,निशांत धाम, जितेश वैश्य, तय्यब नुराणी यांनी विशेष प्रयत्न केले

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!