Thursday, April 25, 2024
Homeनाशिकआजपासून त्र्यंबकचे निवृत्तीनाथ समाधीमंदिर दर्शनासाठी राहणार बंद

आजपासून त्र्यंबकचे निवृत्तीनाथ समाधीमंदिर दर्शनासाठी राहणार बंद

नाशिक | प्रतिनिधी 

जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आली असताना आजपासून त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ समाधीमंदिरदेखील सायंकाळी सहा वाजेपासून बंद ठेवण्यात येणार आहेत.

- Advertisement -

आज त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या देवस्थानच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.  यासोबतच येत्या २० तारखेला भागवत एकादशी निमित्त होणारी महिण्याची वारीदेखील रद्द करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाचे पुढील आदेश येई पर्यंत राहणार मंदिर बंद ठेवण्यात येईल अशी माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.  दरम्यान याकाळात मंदिरातील नित्यनेमाने पार पडणारी पूजाअर्चा तसेच दैनंदिन कार्यक्रम सुरू राहणार असल्याची माहिती देवस्थान   वतीने देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या