निवेकचे अध्यक्ष राजा जॉली तर उपाध्यक्ष जनक सारडा

0

सातपूर | दि.४ प्रतिनिधी – निवेक क्लबच्या अध्यक्षपदी राजकुमार जॉली यांची तर उपाध्यक्ष पदी जनक सारडा यांची आगामी दोन वर्षांसाठी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

निवेक क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष संदीप सोनार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या सभेत द्वैवार्षिक निवडणुकांचा निकाल जाहीर करण्याची पध्दत आहे. त्यानुसार नुतन पदाधिकार्‍यांची बिनविरोध निवड झाल्याचे यावेळी जाहिर करण्यात आली.

१ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या निकालांनंतर नुतन पदाधिकार्‍यांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी राजकूमार जॉली, उपाध्यक्षपदी जनक सारडा, सरचिटणिसपदी संदीप गोयल सचिवपदी रणजीत सिंग सौंध तर खजिनदारपदी अशोक हेंबाडे यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष रमेश वैश्य, समीर भूटानी, संदीप सोनार व निवडून आलेल्या सभासदांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या कार्यक्रमात कार्यकारीणीत निवडून आलेल्या सभासदांसह गौरव अतुल चांडक, शिशीर भार्गव, प्रीथपाल सिंग बिदीं, आशिष महेशेका, पंकज खत्री, राजेंद्र सूर्यवंशी, श्रेयश राठी, प्रणव संगवे, संदीप भदाणे, अर्जुन ललवाणी, तय्यब नुरानी,निमा अध्यक्ष मंगेश पाटणकर, माजी अध्यक्ष मनिष कोंठारी, आशिष अरोरा, नरेंद्र बिरार, शैलेश वैश्य, संदिप भदाणे, आदींसह उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*