Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा; १४ एप्रिलपर्यंत टोलमाफी

Share

नवी दिल्ली | जगभरात कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे १४ एप्रिलपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन ची घोषणा पुढील २१ दिवसांपर्यंत केली.

याकाळात अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सर्व बंद करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे आता देशभरात टोलवसुलीला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी ट्विट करत ही माहिती दिली.

लॉकडाऊनच्या काळात टोलनाक्यांवर कोणत्याही स्वरूपाचा टोल वसूल केला जाणार नाही. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!