Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

सोलापूर : केंद्रीय मंत्री गडकरींना पुन्हा आली भोवळ

Share

सोलापूर | वृत्तसंस्था

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात भोवळ आली. राष्ट्रगीत सुरु असतानाच ही घटना घडली. त्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना उठता आले नाही. त्यानंतर त्यांना औषध देण्यात आले.

गडकरी यांना सार्वजनिक कार्यक्रमावेळी भोवळ आल्याची ही तिसरी घटना असून यामुळे त्यांच्या प्रकृतीची आहे. अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात आज गडकरी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी राष्ट्रगीत सुरू झाले. त्याच वेळी त्यांना भोवळ आली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर ते खुर्चीवर बसले. त्यांनी उठण्याचा प्रयत्नही यावेळी केला मात्र ते शक्य झाले नाही. त्यांना औषध देण्यात आले त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याआधी ८ डिसेंबर २०१८ रोजी नगर जिल्ह्यातील राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान भोवळ आल्याने गडकरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तसेच शिर्डी येथे  २७ एप्रिल २०१९ रोजी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत भाषणादरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी भाषण आटोपते घेतले. दरम्यान, खुर्चीवर बसत असतांना त्यांना भोवळ आली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!