नितीन आगे हत्या, मंत्रालयावर मोर्चा

0
पुणे – खर्डा गावातील अल्पवयीन तरुण नितीन आगे याची हत्या करणार्‍या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच ऑनर किलिंग व जातीय धार्मिक हिंसाचाराच्या घटनांतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी 25 जानेवारी रोजी विविध संस्था-संघटनांच्या वतीने मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
पुणे येथील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. गेल ऑम्वेट विशेष उपस्थित होत्या. याबाबत नियोजनासाठी राज्यव्यापी बैठक रविवारी (दि. 17) मुंबई येथे घेण्यात येणार आहे.
नितीन आगे हत्याकांड खटल्यात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमधील तरतुदीनुसार विशेष न्यायालयाची स्थापना न करणे तसेच विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती न करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यानी घेऊन राजीनामा द्यावा. तसेच या खटल्याची फेरतपासणी व सुनावणी व्हावी आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

*