Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या‘पत्रा’वरुन राज्यात ‘राज’कारण पेटले

‘पत्रा’वरुन राज्यात ‘राज’कारण पेटले

मुंबई

हिंदुत्वाच्या मुद्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वाद पेटला आहे. आता या वादात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही उडी घेतली आहे. यामुळे या मुद्द्यावर राज्यातील राजकारण पेटले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरांत यांनी थेट राज्यपालांच सवाल केला आहे.

- Advertisement -

मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. बार आणि दारूची दुकाने सताड उघडी असताना मंदिरे मात्र डेंजर झोन आहेत का? असा सवाल अमृता फडणवीस यांनी केला आहे. ‘वाह प्रशासन’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अमृता फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. असमर्थ ठरल्यानंतर काही वेळा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी काही वेळा प्रमाणपत्र नक्कीच गरजेचे असते, असा टोला देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी या वादावर एक ट्वीट केले आहे. संजय राऊतांनी काही वर्षांपूर्वी सामनाच्या रोखठोक सदरातील संदर्भ देत आता यालाही तुम्हाला प्रत्युत्तर द्यायचंय का, असा सवाल राणे यांनी विचारला आहे. राऊत यांनी या लेखात ‘धर्मनिरपेक्षता मरण पावली असून भारताला आता हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशी मागणी केली होती’ असं या ट्विटमध्ये नितेश यांनी म्हटले आहे.

थोरांतीची राज्यपालांवर टीका

भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा पदभार असून, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्र लिहिले आहे का?,” असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर राज्यपालांच्या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का, असेही थोरात यांनी म्हटले आहे.

राज्यपालांनी लिहिलेल्या ‘त्या’ पत्राला मुख्यमंत्र्यांचे ‘ठाकरे’ शैलीत उत्तर

काय आहे प्रकरण

राज्यातील मंदिर खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले होते. सोबतच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली होती. या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उत्तर दिलं आहे. माझ्या हिंदुत्त्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. मुंबईला पीओके म्हणणाऱ्याचं हसत-खेळत स्वागत करणं माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या