Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

क्रीडा क्षेत्रातील १० सर्वात प्रभावी महिलांमध्ये निता अंबानी यांचा समावेश

Share

नवी दिल्ली | प्रतिनिधी

मुंबई इंडियन्स क्रिकेट संघ फ्रेंचायझीच्या सर्वेसर्वा निता अंबानी यांचा  टेनिस सुपरस्टार सेरेना विल्यम्स आणि जिम्नॅस्ट सिमोन माईल्स यांच्यासह 2020 क्रीडा जगातील १० सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत नाव आले आहे.

नीता अंबानी या सर्वात श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी यांची पत्नी असून जून 2014 पासून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मंडळावर आहेत.
त्याच्या मुंबई इंडियन्स (एम आय) संघाने चार वेळा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) जिंकला आहे.

स्पोर्ट्स बिझिनेस नेटवर्क, आयएसपोर्ट कनेक्टने २०२० साठी आपली ‘इन्फ्लुएन्शिअल  वूमन इन स्पोर्ट’ यादी जाहीर केली आहे. त्यानुसार मूळ यादीमध्ये 25 महिलांची  निवड करण्यात आली होती. त्यानंतर तज्ज्ञ पॅनलची मते घेण्यात आली. यानंतर दहा अंतिम महिलांची यादी तयार करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये नीता यांचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी पॅनलमध्ये अण्णा लॉकवूड, ग्लोबल सेल्स-टेल्स्ट्राचे प्रमुख, साॅली हॅनकॉक, मॅनेजिंग पार्टनर, आरती डबास, वाई स्पोर्टचे माजी अध्यक्ष आणि स्पोर्ट इन वूमन, आयसीसीचे माजी मीडिया राइट्स ऑफ हेड आणि आयएसपोर्ट कनेक्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वर्मा यांचा समावेश होता.

अंबानी यांनी मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी होण्यासाठी प्रेरित केले आहे.  यासह, देशातील विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक क्रीडा प्रकल्पांमध्ये त्या सहभागी झाल्या आहेत.

या यादीमध्ये टेनिस स्टार सेरेना विल्यम्स आणि नाओमी ओसाका यांचा समावेश आहे. एलि नॉर्मन, कॅथी एंगेल्बर्ट, फिफा सामौरा, मेरी कॉमिस,क्लेयर कॉनर यांचा समावेश आहे.

आयएस पोर्टकनेक्टने सांगितले की,  मूळ निवडलेल्या यादीमध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचा कर्णधार मिताली राज यांचा समावेश आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!