श्रीरामपूर : नगराध्यक्षांना आलेल्या निनावी पत्राचा काँग्रेसकडून निषेध : बिहाणी

0

अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना निवेदन

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूरच्या महिला नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांच्याबद्दल अपशब्द वापरून आलेल्या निनावी पत्राचा काँग्रेस पक्षाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे काँग्रेसचे नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी म्हटले आहे.

हा प्रकार हा दुर्देवी असून या निनावी पत्राचा तीव्र निषेध करीत आहोत. राजकारणामध्ये विचारांचे मतभेद असू शकतात; परंतु वैयक्तिक पातळीवर एका महिला नगराध्यक्षांबद्दल असे निनावी पत्र येणे म्हणजे राजकारण खालच्या थराला गेलेले आहे. श्रीरामपूर शहराच्या राजकारणात आजपर्यंत अनेक राजकीय नेत्यांचे विचारांचे मदभेद होताना दिसत होते;

परंतु अशा प्रकारे सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या महिलांबद्दल बदनामीचे षडयंत्र राचणार्‍यावर कठोर कार्यवाही झाली पाहिजे. श्रीरामपूर शहराच्या राजकारणाची संस्कृती बघता आदर, नम्रता ही दिसून येत होती; परंतु अशा निनावी पात्रांमुळे लोकशाही मार्गाचा चुकीचा वापर होत आहे.

या निनावी पत्राची चौकशी करून संबंधितावर त्वरित कडक कार्यवाही करण्याबाबत काँग्रेसच्यावतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्याकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष सचिन गुजर उपनगराध्यक्ष करण ससाणे, पक्षप्रतोद संजय फंड, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, नगरसेवक दिलीप नागरे, मुक्तार शहा, भारतीताई परदेशी आशाताई रासकर, मीराताई रोटे, चंद्रकला डोळस,

श्रीनिवास बिहाणी, मनोज लबडे, मुजफ्फर शेख, संजय छल्लारे, मुन्ना पठाण, सुभाष तोरणे, भाऊसाहेब डोळस, किरण परदेशी, रियाज पठाण, सुनील क्षीरसागर, पुंडलिक खरे, रावसाहेब आल्हाट, युवराज फंड, अमोल शेटे, कृष्ण पुंड, गोपाल लिंगायत, सुरेश ठुबे, प्रतीक बोरावके, राजेश जोंधळे, नुरा, संजय गोसावी, निलेश करवाळ, सागर दुपटी, प्रताप गुजर, जुबेर शेख आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

*