Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

देशातील पहिली महिला पूर्णवेळ अर्थमंत्री ठरल्या निर्मला सीतारामन

Share

नवी दिल्ली : गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथ घेतली. सोबतच ५७ खासदारांनी देखील गोपनीयतेची शपथ घेतली. भव्य शपथविधी पार पडल्यानंतर आज मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले.

या मंत्रिमंडळामध्ये विशेष उल्लेखनीय पद महिलेच्या हाती देण्यात आले आहे. माजी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दरम्यान मोदी सरकारच्या पर्व १ मध्ये निर्मला सीतारामन यांनी संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. आता देशातील पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री ठरल्या आहेत.

इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सांभाळला होता. त्यामुळे निर्मला सीतारामण यांनी देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.

दरम्यान, सुरुवातीला निर्मला सीतारामन या भाजपा प्रवक्त्या म्हणून देशासमोर आल्या. २०१४ मध्ये निर्मला सीतारामन संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केले. त्यांचा पदव्युत्तर अभ्यासात आंतरराष्ट्रीय व्यापार हा त्यांचा संशोधनाचा विषय होता.

अर्थशास्त्रात त्यांना गती आहे. त्यांचे भाषेवर प्रभुत्व आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वात मध्ये एका महिलेला अर्थमंत्री केल्याचा परिणाम नक्कीच देशात पाहायला मिळणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!