Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यावर गुन्हा; निर्भया पथकाची कारवाई

पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यावर गुन्हा; निर्भया पथकाची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी

मास्क न वापरता शहरात वावरणार्‍या व्यक्तिस पोलिसांनी चौकशी केली असता त्याने पोलिसांशी हुज्जत घातल्याचा प्रकार घडला. त्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई निर्भया पथकाने केली.  करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत पोलिस आणि नागरिकांची तु तु मैं मैं वाढल्याचे चित्र दिसत आहे.

- Advertisement -

मास्क लावणार नाही, त्याचा कोणताही फायदा नाही, अशी भुमिका घेत एकाने पोलिसांबरोबर वाद घातला. असे किरकोळ वादाचे प्रसंग टाळण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा असे मत व्यक्त होते आहे.

संचारबंदी दरम्यान कारण नसताना नागरिक रस्त्यावर उतरल्यानतंर सोशल डिटेन्सिंग पाळले जात नाही. यामुळे कोव्हीड १९ हा जीवघेणा आजार वेगात पसरण्यास मदत होते.

त्यामुळे सरकारने जाहिर केलेल्या लॉकडाउनपर्यंत कमीत कमी नागरिक घराबाहेर पडावेत, पडेल तर त्यांनी या आजाराचा पसार रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.

यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असून, सातत्याने गस्तही घालण्याचे काम होते. गुरूवारी निर्भया पथकाच्या पोलिसस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी व कर्मचारी असे गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती कोणताही मास्क न लावता रस्त्यावर फिरताना दिसला.

या पथकाने सदर व्यक्तीस मास्क वापरण्याची सुचना केली. फार्मसी एजन्सीच्या संबंधित असलेल्या या व्यक्तीने मात्र पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर मास्क लावल्याने या आजाराचा फैलाव कमी होत नाही, असेही सांगितले.

यावेळी गर्दी झाली होती. नागरिकांमध्ये चुकीचा संदेश पसरविण्याचे काम या निमित्ताने होत असल्याने पोलिसांनी लागलीच या इसमास ताब्यात घेऊन त्याला पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलिस ठाण्यात हजर केले.

संबंधित व्यक्तीविरोधात मुंबई पोलिस कायदा कालम ११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली. नागरिकांनी असे किरकोळ वादाचे प्रसंग टाळून पुढील कारवाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या