Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

अवघ्या दहा मिनिटात टवाळखोरांना दणका; निर्भया पथकाची कामगिरी, युवतींकडून कौतुक

Share

नाशिक । प्रतिनिधी

दुपारी एक दिडची वेळ. एचपीटी महाविद्यालाच्या प्रवेशद्वारावर दोन टवाळखोर युवतींची छेडखाणी करत असल्याची फोटोसह माहिती युवतींनी निर्भया पथकाला पाठवली. अवघ्या दहा मिनीटात सुसाट वेगाने जात निर्भया पथकाने दोघांच्या मुस्क्या आवळत त्यांना दणका दिला. इतक्या तात्काळ झालेल्या कारवाईने महाविद्यालयाच्या युवक व युवतींनी कौतुक केले. तसेच या पथकामुळे आपण निर्भय असल्याचा ठाम विश्वासही व्यक्त केला.

कॉलेजरोडवरील एचपीटी सह विविध महाविद्यालय वेगवेगळ्या वेळी सूटत असल्याने कॉलेजरोडवर कायम युवक युवतींची गर्दी असते. अनेकजण घरी जाण्यासाठी बस, रिक्षा तसेच मिळेल ते वाहन शोधत असतात. गर्दीचा गैरफायदा घेत एचपीटी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाजुलाच टार्गट रिक्षा चालकांची गर्दी असते.

अनेकदा ही रिक्षा चालक युवतींना अश्लिल कमेंटस करत असतात. परंतु सडकछाप तसेच गुंड प्रवृत्तीचे हे युवक असल्याने महाविद्यालयाच्या युवती तसेच युवकही यांचा विरोध करू शकत नाहीत.

असाच प्रकार गुरूवारी (दि.10) दुपारी एचपीटी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर घडला. महाविद्यालय सुटल्याने युवक युवती प्रवेशद्वारातून बाहेर पडत होते. तर बाजुलाच रिक्षांजवळ उभ्या असलेल्या दोघांची टवाळखोरी सुरू होती. जवळून जाणार्‍या विद्यार्थीनींना कमेंटस करणे, समोरून चालत अंगावर जाणे, शिट्ट्या वाजवणे, दुचाकीवरील युवतीला थांब तुझ्या गाडीवर बसू दे म्हणने, अश्लिल हावभाव असा प्रकार बराच वेळ सुरू होता.

महाविद्यालयातील काही जागृती युवतींनी गुपचूप मोबाईलमध्ये सदर युवकांचे फोटो काढून ते निर्भया पथकास पाठवले. याची माहिती मिळताच केटीएचएम महाविद्यालयात विद्यार्थींनीची जागृती करत असलेल्या निर्भया पथकाने अवघ्या दहा मिनीटात एचपीटी महाविद्यालय गाठून सबंधीत दोन युवकांच्या मुसक्या आवळल्या त्यांच्यावर टावाळखोरीची कारवाई करून त्यांना न्यायालयात पाठवण्यात आले. निर्भया पथक 2 च्या पोलीस निरिक्षक नेहा सुर्यवंशी, पोलीस नाईक अनिता पाटील, सुरेश घुगे, रविंद्र पवार यांनी ही कारवाई केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!