Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

रक्षाबंधन बाजूला ठेवत पीएसआय छाया देवरेंनी महिलेची छेड काढणाऱ्याला शिकवला धडा

Share

इंदिरानगर | वार्ताहर

सगळीकडे रक्षाबंधनाची व स्वातंत्र्य दिनाची धामधूम सुरू होती. पोलिसांच्या निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक छाया देवरे ह्यादेखील भावाला राखी बांधण्याची तयारी करत होत्या. तेव्हढ्यात त्यांचा भ्रमणध्वनी वाजला. वडाळा गाव परिसरात एकजण महिलेची छेड काढत असल्याचे त्यांना समजले त्वरित त्यांनी घटनास्थळ गाठले. महिलेची छेड काढणाऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, निर्भया पथकाच्या कार्यतत्परतेने सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

अधिक माहिती अशी की, रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिन एकाच दिवशी आल्यामुळे सकाळी सर्वत्र झेंडावंदन पार पडले. त्यानंतर रक्षाबधनाचा उत्साह प्रत्येक घरात होता. निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक छाया देवरे यांच्याही घरी भावाला औन्क्षण करून रक्षाबंधनाचा कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरु होती.

याचवेळी वडाळा गावातील मनपा घरकुल येथील संशयित किरण मल्हार हा परिसरातील महिलांची बरेच दिवसापासून छेडछाड करत  होता.  मात्र त्याच्या दहशतीपुढे पोलिसात तक्रार करायला कुणीही पुढे येत नव्हते. अखेर एका महिलेन धाडस करत निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक छाया देवरे यांना फोन करून माहिती दिली.

त्या त्वरित आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या व त्याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्वेता बेलेकर पोह. गांगुर्डे ,विकास पाटील ,जाधव यांनी कारवाई केली.  महिलेला त्रास देणा-या संशयितास ताब्यात घेतल्यानंतर परिसरातील महिलांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!