Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

निर्भया अत्याचार प्रकरण : फाशी सुनावलेल्या एका दोषीची न्यायालयात पुनर्विचार याचिका

Share
निर्भया अत्याचार प्रकरण : फाशी सुनावलेल्या एका दोषीची न्यायालयात पुनर्विचार याचिका, nirbhaya gang rape case one convict vinay kumar sharma filed a curative petition

नवी दिल्ली | वृत्तसंस्था 

निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरणातील एका दोशीने आज न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. आपल्याला देण्यात आलेली शिक्षा रद्द करावी, अशी मागणी विनय शर्मा नामक दोषीने केली आहे.

अधिक माहिती अशी की, ७ जानेवारीला दिल्ली हायकोर्टाला या प्रकरणातील चार दोषींविरोधात फाशीची शिक्षा सुनावली. या चार दोषींना २२ जानेवारी या दिवशी फाशी देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.

न्यायालयाने तारखेची निश्चिती केल्यानंतर देशात सर्वत्र फाशीच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले होते. या प्रकरणातील सर्व ४ दोषींना २२ जानेवारी या दिवशी सकाळी ७ वाजता एकत्रितपणे तिहार तुरुंगात तुरुंग क्रमांक ३ मध्ये फाशी देण्यात येणार आहे.

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक दोषी असलेल्या अक्षय ठाकूरने केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.  या प्रकरणात दोषी असलेल्या अक्षय ठाकूर याच्या वकिलाला पूर्ण संधी देण्यात आली.

मात्र, दोषीच्या वकिलाने काहीही म्हणणे मांडले नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते.दरम्यान, आज दुसऱ्या एका दोषीने पुन्हा दयेचा अर्ज केल्याने यावर न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!