Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

निर्भया प्रकरणातील दोषींना तिहार तुरुंगात दिली फाशी

Share

नवी दिल्ली l वृत्तसंस्था

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही  दोषींना आज (दि. 20) सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास फाशीची शिक्षा देण्यात आली.

एकाच वेळी चार जणांना फासावर लटकविण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिहारच्या तुरुंगाच्या क्रमांक तीनमध्ये आज ही फाशी दिली गेली. फाशीसाठी बिहारच्या बक्सरमधून दोर मागवण्यात आले होते.

तब्बल सात वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन संघर्षानंतर निर्भयाला आज न्याय मिळाला असल्याची भावना निर्भयाच्या आईकडून व्यक्त करण्यात आली.

दोषींनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत फाशीची शिक्षा रोखण्यासाठी प्रयत्न केला. दिल्ली उच्च न्यायालयाने मध्यरात्री 12 वाजेच्या दरम्यान याचिका फेटाळून लावत फाशीची शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर चारही दोषींना फासावर लटकविण्यात आले.
सात वर्षांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो दिवस अखेर आज आला, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या वडिलांनी दिली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!