Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

निफाड : शिरवाडे शिवारात शॉक लागून महिलेचा मृत्यू

Share

शिरवाडेवाकद (वार्ताहर) : शिरवाडे शिवारात गवत घेत असतांना तारेवर पाय पडून एक महिला मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. लिलाबाई नामदेव वाघ (६०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

येथील फकिरा महादू वाघ यांच्या गट नं.२४४ मध्ये (दि.०७) रोजी झालेल्या वादळात पोल पडून तारा जमिनीवर टेकल्या होत्या. आज सकाळी १०.३० च्या सुमारास लिलाबाई या गावात घेण्यासाठी गेल्या असता त्यांचा पाय उघड्या वीजतारांवर पडल्याने काही क्षणात त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती अंबादास माधव वाघ यांनी लासलगाव पोलिसांना देत पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. तसेच अकस्मात मृत्युची नोंद केली. दिनेशसिंग रजपूत सहा.अभियंता, ए.टी.पाटील कनिष्ठ अभियंता, कामगार तलाठी नंदकिशोर गायकवाड, पोलीस पाटील रामनाथ तनपुरे हेही घटनास्थळी उपस्थित होते.

शेतात पडलेल्या तारेची विद्युत वितरण कंपनीला वारंवार तक्रार करूनही विद्युत वितरण कंपनीने दखल न घेतल्याने त्यांच्या हलगर्जीपणामुळेच अपघात झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!