Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

निफाड : चांदोरी येथे खोदकाम करताना आढळले ‘भुयार’

Share

निफाड | प्रतिनिधी : निफाड तालुक्यातील चांदोरी येथे शुक्रवारी (दि. १९) खोदकाम करत असतांना भुयारी मार्ग आढळून आला आहे. गावातील खंडेराव मंदिर परिसरातील नारायण महाराज पटांगणात शुक्रवार (दि. १९) हे खोदकाम चालू होते. याबाबत पुरातत्त्व विभागाने संशोधन करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.

चांदोरी हे ऐतिहासिक गाव असून या ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी गोदावरी नदी पात्रात असलेलं हेमाडपंथी मंदिर तसेच श्रीराम मंदिर, पंच मुखी महादेव मंदिर, सावकार वाडा, जहांगीर वाडा यामुळे चांदोरी गावाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान चांदोरी येथे खंडेराव मंदिर विकास कामा निमित्त नारायण महाराज पटांगणात खोदकाम सुरू आहे. शुक्रवारी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू असताना खड्डा खोदल्या नंतर पूर्व भागात आतमध्ये तळघर आढळून आले. यास एक दरवाजा असून तळघराची भिंत चुना व शिवकालीन विटांपासून तसेच दगडांनी बनवलेली आहे.

श्रीराम मंदिरा पासून नदीपर्यंत भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते, तो हाच मार्ग असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे. पुरातत्त्व विभागाकडून याबाबत संशोधन करण्याची गरज असल्याचे चांदोरी येथील ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान याठिकाणी भुयार बघण्यास गर्दी होत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!