नदीजोड प्रकल्पातील बोगद्यात पडून ९ मजूर ठार

0

पुणे ता. २० : भिगवणजवळ नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पातील बोगद्यात लिफ्टचा दोर तूटून पडल्याने ९ मजूर ठार झाले आहेत. आज सायंकाळी ही दुर्घटना घडली.

कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत कृष्णा आणि भीमा नदीतील २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्यासाठीच्या प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू आहे. सध्या तेथे ३००च्यावर मजूर कामाला आहेत.

नेहमीप्रमाणे काम संपवून संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास लिफ्टने वरती येताना दोर तुटला आणि सुमारे दोनशे फूट खोल बोगद्यात पडून लिफ्टमधील सर्व मजूर ठार झाले.

LEAVE A REPLY

*