Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

पाकचे समजून भारतीय वायुदलानेच पाडले हेलीकॉप्टर; नाशिकचे पायलट निनाद मांडवगणे झाले होते शहीद

Share

नाशिक | प्रतिनिधी

एका उच्चस्तरीय चौकशीनंतर देण्यात आलेल्या अहवालात जम्मू कश्मीरमधील बडगाम येथे २७ फेब्रुवारी २०१९ रोजी एमआय -१७ हेलीकॉप्टरला भारतीय वायुसेनेनेच पाडल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत नाशिकचे पायलट स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्यासह इतर सहा जवानांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत दोषी चार अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत वायुदलाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिले आहेत.

अधिक माहिती अशी की, २७ फेब्रुवारीच्या दिवशी काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळून सात जवानांचा मृत्यू झाला होता. यादरम्यानच्या काळातच भारत पाकिस्तानदरम्यान हवाई संघर्षही झाला होता.

भारतीय वायू सेनेच्या वरिष्ठ चौकशीनंतर तात्काळ कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. वायुसेनेच्या मुख्यालयाने या घटनेची एयर कमांडर स्तरावरील अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कोर्ट ऑफ इन्क्वायरी (सीओआई)चे आदेश दिले होते.

यामध्ये हेलीकॉप्टरची ती यंत्रणा बंद होती जिच्याद्वारे हेलीकॉप्टर मित्र आहे किंवा शत्रूपक्षाचे आहे. यासोबतच जमिनीवरील अधिकारी आणि हवाई दलाचे जवान यांच्यात समन्वयाचा अभाव होता. यामुळे हवाई संरक्षण रडारवर कुठल्याही प्रकारची नोंद झालेली नव्हती.

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार एका लष्करी सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लष्करी कायद्यांच्या उल्लंघनानुसार दोषी अधिकाऱ्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की, वायुसेनेचे अधिकारीच या घटनेत दोषी अधिकाऱ्यांवरील शिक्षेचा निर्णय घेतील.

वायुसेनेकडून मे महिन्यात या घटनेची गंभीर दखल घेऊन सविस्तर तपासणी करण्यात आली. याच वेळी श्रीनगर एअरबसच्या अधिकाऱ्याची उचलबांगडी केली होती.

भारत पाकीस्तामध्ये हवाई संघर्ष झाले होते. यादरम्यानच्या काळात पीओकेमध्ये भारतीय विमानाने पाकचे विमान पाडल्यानंतर भारतीय पायलट अभिनंदन पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. दरम्यान, त्या १५ मिनिटांच्या अंतरात श्रीनगरमध्ये भारतीय वायुसेनेने अमृतसरकडे विमान नेण्याचे अलर्ट दिले होते.

अलर्ट देत असतानाच बडगाम परिसरात एमआय -१७ हेलीकॉप्टरने उड्डाण केले होते. याच वेळी तांत्रित बिघाडामुळे यंत्रणेशी संपर्क तुटला. हेलीकॉप्टर शत्रूचे कि मित्राचे हे ओळखण्यात भारतीय वायुद्लाला अपयश आले. यादरम्यान, मिसाईलने हे विमान पाडण्यात आले होते. या दुर्घटनेत सात जवानांचा मृत्यू झाला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!