Thursday, May 2, 2024
Homeनगरनिमगाव खैरी रस्त्यावर जीपच्या धडकेत तरुण ठार

निमगाव खैरी रस्त्यावर जीपच्या धडकेत तरुण ठार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर-पुणतांबा रस्त्यावर निमगाव खैरी गावच्या शिवारात एचपी पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगातील महेंद्रा कंपनीच्या काळीपिवळी जीपने

- Advertisement -

समोरुन येणार्‍या जीपला जोराची धडक दिली. या अपघातात निमगाव खैरी येथील एक जण जागीच ठार झाला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर-पुणतांबा रस्त्यावर निमगाव खैरी गावच्या शिवारात एचपी पेट्रोल पंपाजवळ काळीपिवळी जीप नं. एमएच 17 टी 5573 हिच्यावरील चालकाने हयगईने जीप चालवून जीप नं. एमजीएम 5457 हीस जोराची धडक दिली. या अपघातात जीपमधील हरिभाऊ बाळासाहेब भालेराव (वय 25) हा तरुण ठार झाला.

याप्रकरणी मयताचा भाऊ गणेश बाळासाहेब भालेराव याने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी महेंद्रा काळीपिवळी जीप नं. एमएच 17 पी 5573 हिच्यावरील चालकाविरुध्द भादंवि कलम 304 अ, 279, 337, 338, 427, मोटर वाहन कायदा कलम 184, 134, अ ब, 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. बोरसे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या