Type to search

Featured जळगाव फिचर्स

निंभोरासिम येथे येथे दरड कोसळून दोन युवकांचा जागीच मृत्यू

Share

 रावेर| प्रतिनिधी

निंभोरासिम (ता.रावेर) येथील तापी नदीची दरड कोसळल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची तर एक जण गंभीर गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

येथील दीपक मोहन सुवर्ण वय-२० व सुधानंद सोपान पाटील वय २२ हे दोघेजण या ठिकाणी उपस्थित होते. दरड कोसळत असल्याचा त्यांना अंदाज आल्याने दोघांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यांच्या अंगावर दरड कोसळल्याने दोघेजण त्याखाली दबून जागीच मृत्युमुखी पडले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. दोघांच्या अंगावरून तब्बल 40 ट्रॉल्या माती बाजूला सारून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले असून नातेवाईकांची गर्दी याठिकाणी झाली आहे.सदरील युवक बकऱ्या चरण्यासाठी गेल्याचे समोर येत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!